संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून विधवा,निराधार पुरुष,गंभीर आजारी रुग्ण, तुरुंगात असलेल्या कैद्यांची कुटुंबे ,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आणि विशेषतः 65 वर्षांखालील दिव्यांगाना आर्थिक मदत दिली जाते.आतापर्यंत या दोन्ही योजनांमधून दिव्यांगांना दरमहा 1500 रुपये मिळत होते.आता या रकमेत एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
श्रावण बाळ योजना ही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृध्द निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवते. वृद्धापकाळात त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि सन्मानाने जगता यावे हा या योजनेचा उद्देश आहे.शासनाच्या अलीकडील निर्णयानुसार या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना देखील वाढीव दराने दरमहा 2500 रुपये मिळणार आहे.
0 Comments