political news, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची वैजापुरात बैठक

वैजापूर, ता. 25 - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (ता.25) वैजापूर येथे पार पडली.

प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासंदर्भात चर्चा झाली. 
सामान्य कार्यकर्त्याला कशाप्रकारे न्याय देता येईल याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये धोरण ठरविण्याचा निर्णय  घेण्यात आला. तसेच सर्वसामान्याच्या भेटीगाठीवर भर देऊन दिलेले उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. 
या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे माजी सभापती ॲड.प्रमोददादा जगताप, ॲड.आर डी.थोट, शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राजु (काका) कराळे, मनसे तालुकाप्रमुख सुनील गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाप्रमुख प्रकाशबापू ठुबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल संत, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सावंत पाटील, युवक जिल्हा उपाध्यक संतोष सरोवर, सेवादल प्रदेशाध्यक्ष सुनील बोडके, मनसे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप आवारे, युवा नेते आण्णासाहेब पवार, तालुका उपाध्यक्ष कैलास कदम, निवृत्ती तुपे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष दादासाहेब घायवट, अल्पसंख्यांक अध्यक्ष अकबर शेख, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष रतन पगारे, युवक तालुकाध्यक्ष अजय काकडे, युवककाँग्रेसचे तालुकाध्यक्ष  रोहित आहेर, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव पडवळ, विलास वाघ, युवक उपतालुकाध्यक्ष पवन घायवट, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोमवंशी, अंकुश तुपे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.               

Post a Comment

0 Comments