वैजापूर तालुक्यात 31 हजार 691 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान
छञपती संभाजीनगर, ता.27 - छञपती संभाजीनगर जिल्हयात यंदा कपाशी पिकाची सरासरीच्या तुलनेत कमी लागवड झाली त्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख 60 हजार 419 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट आहे.
कृषी,महसूल व पंचायत विभागाच्या एकत्रित अहवालानुसार ,सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून काही भागात एक किंवा दोन वेचणीच होण्याची शक्यता आहे. कासाची वेचणी करणे शेतकरी व मजुरांना प्रचंड जड जात असून वेचलेला कापूस वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या व मध्यम सरी कोसळत असल्याने हा पाऊस फुटलेल्या कापसाला ओला करून त्याचा दर्जा घसरविण्यास कारणीभूत ठरत असल्याची स्थिती आहे.
0 Comments