news today, मुंबईकर बांधवांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात ; मदत निधी जमा करून शेतकऱ्यांना बियाणे व सेंद्रिय खताचे वाटप

30 शेतकऱ्यांना 600 किलो बियाणे आणि 3000 किलो सेंद्रिय खत वाटप ..

वैजापूर, ता.26 - मुंबई शहरातील 'आम्ही विद्याभवनची पोरं' या व्हॉट्सअप ग्रुप आणि त्यांच्या मित्रमंडळींच्यावतीने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी जमा केला. आणि जमा झालेल्या या निधीतून वैजापूर तालुक्यातील ढेकू नदीच्या महापुरात पिके वाहून गेलेल्या आणि पाणी साचल्यामुळे पिके खराब झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी रब्बी हंगामात पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला 20 किलो हरबरा बियाणे आणि 100 किलो सेंद्रिय खत अशा स्वरूपात मदत करण्यात आली. 

या मदतीचे वाटप धोंदलगाव येथे करण्यात आले. या प्रसंगी डॉ. बबनराव साळे, गोकुळ सुरासे, आदिनाथ उबाळे, सतिश झाल्टे,बाळासाहेब जिवरख, विश्वनाथ ढंगारे , सुखदेव डमाळे, संतोष मिसाळ, संतोष आवारे यांच्यासह ग्रामस्थ आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी विपिन साळे यांनी मुंबईकर मित्रांच्या मदतीचे व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे तसेच शेतकऱ्यांप्रती असलेल्या सहृदय भावनेचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments