मुंबई, ता.21- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व निवडणुका पार पडेपर्यंत आपण आपल्या कार्यक्षेत्रातच राहावे. अशा सूचना शिवसेना पक्षातर्फे (शिंदे गट) लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी मंगळवारी (ता.21) यासंदर्भात आदेश काढले आहेत.
काही अपरिहार्य कारणास्तव आपणास कार्यक्षेत्र बाहेर जावयाचे असल्यास त्याबाबत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला अवगत करावे तसेच मध्यवर्ती कार्यालयातून आपणास कार्यक्षेत्र बाहेरची जबाबदारी सोपविण्याबाबत सूचित केल्यास त्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे असे आदेशात म्हटले आहे. पक्षाचे माजी लोकप्रतिनिधीपासून ते शाखाप्रमुख या सर्वांना हे आदेश लागू राहील असे सूचित करण्यात आले आहे.
0 Comments