जफर ए.खान
------------------------
वैजापूर ता.18- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वैजापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (ता.18) पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बी यू. बिघोत यांनी प्रसिध्द केला आहे. या प्रारूप आराखड्यावर 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना मांडता येणार आहेत.
वैजापूर नगरपालिका ही 'ब' वर्ग नगरपालिका असून शहराची लोकसंख्या 41 हजार 296 आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 6279 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1061 इतकी आहे. लोकसंख्येनुसार प्रभाग संख्येत एकने वाढ झाली आहे असून, आता प्रभाग संख्या 12 झाली आहे. नगरसेवकांच्या संख्येत दोनने वाढ होऊन आता नगरसेवकांची संख्या 25 झाली आहे. त्यामुळे शहरातील अकरा प्रभाग दोन सदस्यीय व एक प्रभाग तीन सदस्यीय असणार आहे प्रभाग क्रमांक 1 ते 11 मध्ये दोन नगरसेवक तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये तीन नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
प्रभाग क्रमांक व लोकसंख्या पुढीलप्रमणे आहे ...
प्रभाग क्रमांक लोकसंख्या एस.सी. एस.टी.
1 3033 169 447
2 3313 671 66
3 3184 1286 38
4 3099 63 00
5 3424 33 02
6 3084 31 21
7 3625 757 22
8 3258 465 96
9 3419 328 19
10 3016 490 170
11 3377 160 8
12 5464 1826 96
---------------------------------------------------------------------------- एकूण 41,296 6,279 1,061
---------------------------------------------------------------------
31ऑगस्टपर्यंत प्राप्त या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर नागरिकांना हरकती व सूचना मांडता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होईन. त्यानंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागाकडे सादर करतील. त्यानंतर नगरविकास विभागातर्फे 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. राज्य निवडणूक आयोग 26 सप्टेंबर ते सप्टेंबरपर्यंत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनाद्वारे प्रसिध्द करणार आहे .
0 Comments