news today, वैजापूर नगरपालिका भाजपा - राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे ; नगराध्यक्षपदासह 11 जागांवर भाजप विजयी

शिवसेना शिंदे गटाला 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4 जागा 

भाजपच्या विजयी मिरवणुकीत मंत्री अतुल सावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, डॉ.दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती 


वैजापूर, ता.21 - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजच - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युतीला नगराध्यक्षपदासह सदस्यांच्या 15 जागांवर विजय मिळाला. . तर शिवसेना शिंदे गटाला 10 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.दिनेश परदेशी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय बोरणारे यांचा 6 हजार 248 मतांनी पराभव केला 

विजयी घोषित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारताना भाजपचे डॉ. दिनेश परदेशी 

डॉ.दिनेशी परदेशीं यांना 18 हजार 28 मते मिळाली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी संजय बोरनारे यांनी 11 हजार 780 मते मिळवली तर नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले काँग्रेसचे तिसरे उमेदवार सुभाष उत्तमराव गायकवाड यांना केवळ एक हजार 47 मतांवर समाधान मानावे लागले.
        
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 25 पैकी 11 जागांवर विजय मिळवला व त्यांचा युतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवलेल्या आठपैकी चार जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले. आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या शिवसेनेला 25 पैकी 10 जागांवर विजय मिळवता आला. भारतीय जनता पक्षाने 19 जागा लढवून 11 जागा जिंकल्या.
    नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 175 मतदारांनी तिन्ही उमेदवारांना नाकारल्याचे नोटा मतदानवरून दिसून आले तर बारा प्रभागात सदस्यपदाच्या निवडणुकीत 858 मतदारांनी कुणालाही मतदान केले नाही. भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 58 टक्के मते मिळवली तर शिवसेनेने जवळपास 38 टक्के मते घेतली.

प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या ज्योती ताई जोशी या विजयी झाल्यानंतर जल्लोष साजरा करताना त्यांचे कुटुंबीय..

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी भागवत बिघोत, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयात बारा टेबलवर सात फेऱ्यानंतर दुपारी बारा वाजता निवडणुकीचे शेवटच्या फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यांनतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत डॉ परदेशीं यांच्या विजयाचा जल्लोष केला. डॉ.परदेशीं यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, भागवत बिघोत व सुनील सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

नगरपालिका निवडणुकीत आठव्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान 

निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ...

प्रभाग क्र.-1 बक्ष शेख सुमैय्या सोहेल (भाजप, 1160 मते)
पारस घाटे (शिवसेना-1021 मते)

प्रभाग क्र.-2 मोनाली खैरे (भाजप-1513 मते)
विशाल संचेती (भाजपा- 1944 मते)

प्रभाग क्र.-3 पूजा त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस-1620 मते)
शेख रियाज अकील गब्बु शेठ (राष्ट्रवादी काँग्रेस-१६१८ मते)

प्रभाग क्र.- 4 स्वप्नील जेजुरकर (शिवसेना 1621 मते)
संगीता राजपूत (भाजप - 1526 मते )

प्रभाग क्र. - 5 जयश्री चौधरी (शिवसेना-1353 मते)
साबेर खान अमजद खान (शिवसेना-1639 मते)

प्रभाग क्र.- 6 दीपा राजपूत (भाजपा-1430 मते)
ताहेर साबेर खान (सुलतान खान) (शिवसेना-1189 मते)

प्रभाग क्र.- 7 राहुल त्रिभुवन (शिवसेना -1301 मते) 
सविता चव्हाण (भाजप -982 मते)

प्रभाग क्र -  8 लता वाणी (भाजप-१००६ मते)
बाबासाहेब पुतळे (शिवसेना-१०३० मते)

प्रभाग क्र-9 सैय्यद अमिर अली महेबूब अली (शिवसेना-1218 मते) सुरेखा घाटे (शिवसेना- 1019 मते) 

प्रभाग क्र - 10 ज्योती जोशी (भाजप- 982 मते) 
कुरेशी शे. हमीद शे. हुसेन (शिवसेना - 901 मते)

प्रभाग क्र - 11 दशरथ बनकर (भाजप- 921 मते)
सुवर्णा ठोंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस-1213 मते)

प्रभाग क्र -12 राजेश गायकवाड (भाजप-1670 मते)
जयश्री राजपूत (भाजपा - 2228 मते)
कविता शिंदे (भाजप - 2423 मते)  

लक्षणीय लढती ...

1) प्रभाग क्रमांक 7 ब मध्ये अपक्ष उमेदवार निता पंकज राजपूत यांचा केवळ 17 मतांनी पराभव झाला. या जागेवर भाजपच्या सविता शैलेश चव्हाण यांनी 982 मते घेत निसटता विजय मिळावला.
2) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश घेतलेले प्रकाश चव्हाण यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. शिवसेनेचे बाबासाहेब पुतळे यांनी त्यांचा प्रभाग क्रमांक 8 मध्ये केवळ 144 मतांनी पराभव केला. तसेच प्रकाश चव्हाण यांच्या पत्नी चित्रा चव्हाण (भाजप) यादेखील प्रभाग क्रमांक 9 मधून पराजित झाल्या.
3) माजी आमदार दिवंगत आर. एम. वाणी यांच्या स्नुषा लता लिमेश वाणी (भाजप) या प्रभाग क्रमांक 8 मधून 1006 मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सोनल साळुंके यांचा केवळ 99 मतांनी पराभव केला.

4) वडील व मुलगा विजयी 

माजी नगराध्यक्ष साबेर खान अमजद खान व त्यांचा मुलगा ताहेर साबेर खान (सुलतान खान) या दोघांच्याही गळ्यात मतदारांनी विजयी माळा घातली. साबेर खान हे प्रभाग क्रमांक 5 ब मधून 1639 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शेख इम्रान यांचा तब्बल 810 मतांनी पराभव केला. साबेर खान हे सलग आठव्यांदा निवडून आले तर त्यांचा मुलगा सुलतान खान यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली त्यांनी प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये राष्ट्रवादीचे मोहमद अल्ताफ यांचा 299 मतांनी पराभव केला.


Post a Comment

0 Comments