news today, वाळू तस्करांशी संगनमत ; शिपाई बबन हजारे वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातून कार्यमुक्त

उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांची कारवाई 


वैजापूर, ता.20 - तालुक्यातील गोदावरी आणि शिवना नदीकाठच्या वाळू तस्करांशी संगनमत करून त्यांना गौण खनिज पथकाच्या गस्तीची माहिती पुरविणे तसेच अधिकारी यांच्या नावाने देवाण घेवाण करणे या कारणावरून उपविभाग अधिकारी कार्यालयातील शिपाई बबन हजारे यास उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी कार्यमुक्त केले आहे.
 
या संदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, तालुक्यातील गोदावरी नदी आणि शिवना नदीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक सुरू असल्याच्या बऱ्याच तक्रारी येत होत्या. याबाबत शिपाई बबन हजारे यांना कार्यालयाच्यावतीने समज देण्यात येऊनही त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने. जिल्हाधिकारी यांनी शिपाई बबन हजारे यांना 25 फेब्रुवारी 2025 रोजी नोटीस बजावली होती.






Post a Comment

0 Comments