छत्रपती संभाजीनगर, ता.23 - समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांची संवाद संवेदनशील आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गतिशीलतेने काम केल्याने सुशासन होईल असा विश्वास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला. सुशासन सप्ताहनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेत निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांच्यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख.व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले की, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही .यासाठी नागरिकांशी संवाद असावा ,विकसित भारतासाठी सुशासन सप्ताह अंतर्गत विविध तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चॅट बॉट, क्यूआर कोड, ऑनलाइन प्रमाणपत्र हे वितरित केले जात आहेत. त्याचाच भाग हा सुशासन सप्ताह निमित्त नागरिकांच्या सुविधासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कटिबद्ध असायला हवे. बदलत्या काळानुसार लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत .यासाठी गतिशील आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे. जनतेचा विश्वास प्रशासनावर वृद्धिंगत व्हावा अशा पद्धतीने त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसादही दिला गेला पाहिजे असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी प्रशिक्षणातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले.
कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रशासन हे सुशासन कशा पद्धतीने करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये कमी कालावधीमध्ये नागरिकांच्या अडीअडचणी सोडवने आवश्यक आहे. तसेच प्रशासनातील विविध अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे ही आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध स्तरावर शासनाकडे विविध विषयाची माहिती मागितली जाते ,ही माहिती सादर करत असताना संबंधित कार्यालयाने परिपूर्ण आणि अचूक देणे आवश्यक आहे .या माहितीच्या आधारावर केंद्रशासन आणि राज्यस्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेतले जात असतात या धोरणात्मक निर्णयांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने आपल्या कामकाजाची पारदर्शकपणे माहिती सादर करावी तसेच कोणतेही काम करत असताना अधिकाऱ्याने विचार स्पष्ट ठेवावेत .लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयाची, कामकाजाचा पॅटर्न होत असतो आणि हा पॅटर्न नागरिक आणि त्यांच्यासाठी उपयुक्त असावा. माणसाच्या हितासाठी हा तंत्रज्ञानाचा वापर हवा. येणारा प्रत्येक नागरिकांच्या ऐकून घ्यावे . संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.त्या मार्फत शासनाच्या आणि प्रशासनाचा गाभा कळत असतो या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना जनहितार्थ निर्णय घेत असताना याचा वापर करता येतो असा विचार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करत असताना तांत्रिक बाबीचा अडसर दूर करून सकारात्मक उद्देशाने आणि प्रामाणिक पद्धतीने काम केल्याने प्रशासन हे सुशासन होत असते असे मुंडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की ,जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम घेऊन प्रशासन हे सुशासन करण्याच्या अनुषंगाने लोकाभिमुख करून विविध उपक्रम राबवले. यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी, एक हात मदतीचा, दशसूत्री उपक्रम, अर्ज द्या, कर्ज घ्या, जलसमृद्ध गाव,अशा विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी विभागीय आयुक्तांसमोर सादर केला. यामधून प्रशासन हे लोकाभिमुख आणि सुशासित करण्यासाठीचा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत यांची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी आभार मानले. कायद्याच्या अंमलबजावणी सकारात्मक पद्धतीने करण्यासाठीची संवेदनशीलता आवश्यक असते. त्यातून आपण सुशासन करू शकतो आणि हा विश्वास सर्वांनी लक्षात ठेवून प्रशासनात काम करावे असे सांगितले . काम करत असताना जिल्हा प्रशासनातल्या सर्व घटकांची एक टीम म्हणून काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी समारोपात नमूद केले.
प्रस्ताविकात उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाच्या संगीता राठोड यांनी दिले या सुशासन सप्ताह साजरा करणे मागचा हेतू आणि उद्देश याविषयी सांगितले. सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले .यामध्ये दस्तऐवज प्रमाणीकरण याविषयी माहिती तंत्रज्ञान अधिकारी शरद दिवेकर यांनी सादरीकरण केले तसेच श्रीमती माळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने राबवलेल्या दशसूत्री उपक्रमाची माहिती दिली.
0 Comments