वैजापूर, ता.23 - प्रतिनिधी - भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने कारमधील एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. हा अपघात वैजापूर खंडाळा रस्त्यावर रोटेगाव उड्डाण पुलाजवळ रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला.
ऋषिकेश राजू सोळसे (25 वर्ष) असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे. तर आदीत्य थोरात (22 वर्ष), सिद्धार्थ राजू सोळसे (21 वर्ष) व कृष्णा संतोष कटारे (20 वर्ष ) हे तिन जण या अपघातात जखमी झाले.मयत व जखमी हे तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील रहिवासी आहे.
ऋषिकेश सोळसे हे कार (एम एच 02 सी आर 6540) मध्ये वैजापूर येथून लोणी बुद्रुक येथे जात होते. त्यावेळी रोटेगाव उड्डाण पुलाजवळ समोर कन्नडकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीवर कार जाऊन धडकली. जखमीवर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत ऋषिकेश याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
0 Comments