वैजापूर ता-18/ प्रतिनिधी - वैजापूर शहराच्या नागरिकांनी मला दुसऱ्यांदा तालुक्याची सेवा करण्याची संधी संधी दिली आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणे हे माझे कर्तव्य असून शहरातील विविध विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.असे प्रतिपादन आ.रमेश पाटील बोरणारे यांनी सोमवारी (ता.18) शहरातील वैद्यनाथ महादेव मंदिरातील विविध कामाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलतांना केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून आ.बोरणारे यांनी या मंदिराच्या सुशोभिकरण कामासाठी 50 लाख रुपये उपलब्ध करून दिला या कामाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या मंदिराच्या परिसरात सभा मंडप व डोम ही बांधून देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मंदिराच्या सुशोभिकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महादेव मंदिराचे विश्वस्त डॉ.विजयकुमार सोनी, प्रशांत कंगले, विजय वेद, सौ.अंजलीताई जोशी, जितेंद्र पवार, सुधाकर साळुंके, मुकुंदशेठ दाभाडे यांनी आ.बोरणारे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार प्रशांत नाना कंगले यांनी मानले.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष साबेरखान म्हणाले की, आ. बोरणारे यांनी वैजापूर शहराच्या विकासासाठी आतापर्यंत जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून शहरातील सुंदर गणपती मंदिर परिसरात शेगावीचे संत गजानन महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठीही त्यानी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर आ.बोरणारे यांनी मंदिरासाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिला तसेच अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर शहराचे दैवत श्री संकट मोचन हनुमान मंदिरचे बांधकाम पूर्णपणे दगडात व लवकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही आ.बोरणार म्हणाले.
कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, डॉ. एस.एम.जोशी,भागीनाथ मगर, दशरथ बनकर, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, अंकुश पाटील हिंगे, प्रकाश बोथरा, पारस बोथरा, श्रावण चौधरी, अमोल बोरनारे, संजय बोरनारे, संगीता बोरनारे, देवदत्त पवार, वर्षा बोरनारे, छाया बोरनारे, राजू लालसरे, सुप्रिया व्यवहारे, स्वप्नील जेजुरकर, डॉ.संतोष गंगवाल, बळीराम राजपूत आदींची उपस्थिती होती.
0 Comments