वैजापूर, ता.20 - वैजापूर ग्रामीण एक अंतर्गत एका शेतवस्तीवरील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सकाळी वन विभागाला मिळावी. या माहितीच्या आधारे वन परीक्षेत्र अधिकारी पी. बी. भिसे, वनपाल ए.के.पाटील, वनरक्षक ए.एम.सय्यद, सुरज शेळके यांच्यासह वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी बिबट्या पडल्या त्या विहिरीच्या परिसरात ग्रामस्थ जमा झाले होते. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आधी विहिरीत बाज सोडण्यात आली. त्यानंतर हा बिबट्या बाजेवर आल्यानंतर पिंजऱ्यात पकडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बिबट्या पकडल्यामुळे वैजापूर ग्रामीण मधील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मागील अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली होती.
हा बिबट रात्री विहिरीत पडल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवले. वनविभागाने याची दखल घेत तातडीने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केल्याने गावकऱ्यांनी निश्वास सोडला आहे.
फोटो: वैजापूर शहराजवळ ग्रामीण हद्दीत एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली.
0 Comments