छत्रपती संभाजीनगर, ता.18 - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात “अल्पसंख्याक हक्क दिवस” साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी कार्यालयामार्फत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आयुक्त, अल्पसंख्याक विभाग श्रीमती प्रतिभा इंगळे होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तसेच अब्दुल वाजिद कादरी, सरबजीत सिंग, शहापूर दोरडी, महावीर पाटणी, वसीम शेख, डॉ. अहमद शरीफ देशमुख आदी उपस्थित होते.
अल्पसंख्यकांच्या कायदेशीर व घटनात्मक हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. फिरदोज फातिमा यांनी केले. महिला जागृती व अल्पसंख्याक हक्कांची जाणीव याविषयी श्रीमती अर्पिता शरद यांनी माहिती दिली. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच मार्टीबाबतची माहिती ॲड. पठाण अजहर जब्बार यांनी सादर केली.
कार्यक्रमात महावीर पाटणी, सरबजीत सिंग, अब्दुल वाजिद कादरी, झिया सर, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. वसीम शेख तसेच काझी कल्लीममुल्ला सिध्दीकी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्ताने कायदेशीर व घटनात्मक हक्क, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच जनजागृतीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
श्रीमती प्रतिभा इंगळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.सहा. जिल्हा नियोजन अधिकारी राजू भिंगारे यांनी आभार मानले.
0 Comments