news today, वैजापूर पालिकेच्या दोन जागांसाठी उद्या प्रतिष्ठेची लढत

प्रभाग क्रमांक 2- ब मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष 

वैजापूर, ता. -  उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्यामुळे स्थगित झालेल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब या दोन जागांसाठी शनिवारी (ता.20) मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी चुरशीची लढत होत असून 2 ब जागेवरील लढत प्रतिष्ठेची असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

            विशाल संचेती                    सागर गुंड 

ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, या संदर्भात 22 नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थगिती देण्यात येणाऱ्या या सर्व ठिकाणी सुधारित वेळापत्रकानुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार वैजापूर पालिकेच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

वैजापुरात प्रभाग क्रमांक 1 अ आणि 2 ब या दोन जागांसाठी चुरशीची लढत...
----------------------------------------------------------

वैजापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 अ हा  अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असून यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बक्ष शेख सुमैय्या सोहैल यांनी तर शिवसेना शिंदे गटातर्फे शेख मसिरा परवीन मो.अशफाक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या दोन्ही उमेदवार आपसात नातलग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बक्ष शेख सुमैय्या यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदे गटाच्या उमेदवार शेख मसिरा परवीन यांनी आक्षेप दाखल केला होता तर प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये भाजपचे उमेदवार विशाल संचेती यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्डे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. संचेती यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. या निर्णयाविरुद्ध संचेती यांनी न्यायालयात दाद मागितली होती व न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. 

प्रतिष्ठेची लढत ...

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्ड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या जागेवरील अपक्ष उमेदवार सागर गुंड यांना शिवसेनेने पाठींबा दिला आहे. भाजप उमेदवार विशाल संचेती यांच्याशी त्यांची लढत होत असून अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 





 



 





Post a Comment

0 Comments