news today, वैजापुरातील दाणे वस्ती येथे विहिरीत बिबट्या पडला ; वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

वैजापूर, ता. 19 - वैजापुरातील दाणे वस्ती येथील गट 474 मध्ये गणेश मलिक यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी (ता.19)  सकाळी उघडकीस आली. गणेश मलिक हे शेतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. 

त्यांनी परिसरातील लोकांना ही माहिती दिल्यानंतर अरविंद दाणे, श्रीराम दाणे, ताराचंद दाणे, सतीश अंभोरे, दत्तू दाणे, अजय मलिक, सागर आंबोरे, भगवान दाणे, सागर राजपूत, कचरू वाणी यांनी तत्काल घटनास्थळी धाव घेतली व विहिरीत बाज सोडली. घटनेची माहिती दत्ता गायकवाड यांनी वन विभागाला कळवली. यानंतर वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

Post a Comment

0 Comments