वैजापूर तालुक्यातील पारळा येथील घटना
वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी - शेततळ्यात बुडून अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.18) सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील पाराळा येथे घडली. पवन प्रकाश सुरडकर (वय 18 वर्ष) असे मृताचे नाव असून, तो जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी होता.
पवन सुरडकर हा रक्षा बंधनासाठी आलेला होता. पाराळा परिसरातील शेत तळ्यात पाण्यात पडल्याने त्यास दादासाहेब हौशीराम काळे (रा. शिऊर) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिऊर येथे दाखल केले. मात्र, त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल आघाडे हे करीत आहेत.
0 Comments