news today, मनेगांव येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू:


वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी - विजेचा धक्का बसल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.18) सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील मनेगाव येथे घडली. सुभाष शिवाजी साळुंके (वय 41 वर्ष) रा. मनेगाव असे या घटनेतील मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष साळुंके यांना राहत्या घरी इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांना उद्धव उत्तम साळुंके यांनी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस नाईक जीवन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल थोरात हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments