गारज दि 19/ प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील गारजसह परिसरात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने ढेकु ,शिवना खडकी, खारी अदिसह ओढ्या नाल्यांना पुर आला तर खारी नदीला आलेल्या पुरामुळे झोलेगाव येथील शेतकरी मनोज सुर्यभान काकडे यांच्या गट नंबर 83 या शेतात पुराचे पाणी गेल्याने त्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेली नवीन विहीरीत पूर्णपणे पाणी शिरल्याने संपूर्ण विहिर ढासाळली आहे यामुळे शेतकऱ्यांचे सात ते आठ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे या शेतकऱ्याचा पूर्णपणे उदारनिर्वाह याच शेतावर आणि विहिरीवर होता तेव्हा शेतकऱ्याचा तात्काळ पंचनामा करून त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
0 Comments