आमदार रमेश बोरनारे सोशल मीडियावर मनमोकळेपणाने व्यक्त झाले. त्यांनी शहरातील एका दवाखान्यात सुरू असलेल्या 'गोरखधंद्या'चा पर्दाफाश केला. सामान्य नागरिक डाॅक्टरला देव मानतात. परंतु हेच डाॅक्टर 'कसाई' होऊन चिरफाड करून रुग्णांसह शासनाला कसे लुटतात ? आणि भरमसाठ पैसा कमवून फायदा कसा घेतात ? याचा पाढाच बोरणारेनीं वाचून दाखविला. तुमचा वैद्यकीय व्यवसाय कितीही मोठा असला तरी किमान गरीबांना तरी सोडा. अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बोरणारे म्हणाले की, 104 दवाखान्यांची यादी माझ्याकडे आलेली आहे आणि ती मी बघितली. त्यात शहरातील एका दवाखान्यातील गंभीर प्रकार माझ्या निदर्शनास आला. जेव्हा हा विषय मला मांडायचा तेव्हा मी भांडाफोड करीलच. असे ठणकावून सांगत, शस्त्रक्रिया एकाची करायची असल्यास त्याच्या समवेत दोन डमी (बनावट) रुग्ण दाखवून त्यांची आधारकार्ड घेतली जातात. त्यानंतर अप्रूव्हल घेऊन शस्त्रक्रिया केल्याचे दाखविले जाते. किती मोठी फसवणूक आहे ही. असं सांगत जेव्हा लेखापरीक्षण होईल तेव्हा मी सोडणार तर नाहीच. पण कुणीतरी भांडाफोड करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची हिंमत होणार नाही. बोरणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते म्हणाले की, मला प्रत्यक्षात काही रुग्ण येऊन भेटले आणि त्यांनी हा 'गोरखधंदा' उघड केला. यावर माझं एकच म्हणणं आहे की, 'त्या' रुग्णालयात जाऊन विचारलं पाहिजे की, तुमच्यावर कोणती शस्त्रक्रिया केली गेली. तेव्हाच 'दूध का दूध और पाणी का पाणी' होईल. असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे बोरनारेंनी 'त्या' दवखान्याचे नाव जरी बोलण्यातून उघड केले नसले तरी तो 'लुटारू दवाखाना' शहरातीलच आहे. असे ठामपणे सांगून वेळ आल्यानंतर या 'धंद्या'चा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. असे आत्मविश्वासाने सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत या गोरखधंद्याचे बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही. हेही तितकेच खरे !
'अंधेरनगरी चौपट राजा' कारभार !
शहरातील 'त्या' दवाखान्यात जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेकांची लूट तर झालीच. परंतु शासनाचीही लूट करून धुळफेक केली. असंही बोरनारे म्हणाले. गेल्या कित्येक दिवसांपासून या दवाखान्यात 'अंधेरनगरी चौपट राजा' कारभार सुरू आहे. परंतु तक्रार द्यायला कुणी धजावत नाही? त्यामुळे त्यांचे चांगलेच 'फावत' आहे. परंतु आता आमदार रमेश बोरनारेसारखा 'गुरु' भेटल्यामुळे या दवाखान्याचे पितळ उघडे पडून सत्यता बाहेर आल्याशिवाय राहणार नाही.
0 Comments