news today, स्थानिक विकास कामांसाठी आमदारांना 5 कोटीचा निधी ; पहिला टप्प्यात 3 कोटी रुपये

विकास कामांसाठी आमदारांना 1 हजार 354 कोटी रुपयांचा निधी मंजूर ...

मुंबई, ता.02 - आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना विकास कामांसाठी 1 हजार 354 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. संबंधित आमदारांना त्यांच्या मतदार संघातील प्रध्यान्यांच्या विकास कामांसाठी हा निधी वापरण्याची मुभा देण्यात आली असून या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता,शाळा, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सोयी सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. 

राज्यातील आमदारांसाठी आलेल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येकी 5 कोटींच्या मंजूर निधीपैकी 3 कोटी रुपयांचा पहिला टप्पा म्हणून एकूण 1 हजार 354 कोटी रुपयांचे वितरण वित्त विभागाने मंजूर केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. या निधीचा लाभ 267 विधानसभा सदस्य आणि 54 विधान परिषद सदस्यांना देण्यात आला आहे.  हा निधी काल वित्त विभागाच्या मान्यतेनंतर राज्यभरात वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यालय मुंबई असले तरी प्रत्यक्ष लाभ सर्व जिल्हयातील मतदारसंघाना होणार आहे. मूलभूत विकास कामांसाठी आमदार निधी अत्यंत उपयुक्त ठरतो. आमदार निधी वितरणाला गती मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यास मदत होणार आहे. 


आमदार निधी 1 कोटीवरून 5 कोटी करण्याचा निर्णय अजित दादांचा...

विशेष म्हणजे आमदारांचा वार्षिक निधी एक कोटीवरून 5 कोटी करण्याचा निर्णय स्व. अजित पवार यांनीच घेतला होता आणि या निधी वितरणाच्या फाईलवरही त्यांची शेवटची स्वाक्षरी असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

2025 - 2026 या आर्थिक वर्षासाठी तरतूद...

सन 2025 -26 या आर्थिक वर्षासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासाठी एकूण 2 हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.यापैकी आधीच 660 कोटी रुपये वितरित झाले आहेत. उर्वरित निधीपैकी वित्त विभागाकडून 944.62 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून शिल्लक 409.38 कोटींसह एकूण 1 हजार 354 कोटी रुपये सद्याच्या टप्प्यात वितरणासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments