छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.या 21 पैकी एका जागेवर एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे आता 20 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले.त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी आहे. उर्वरित 12 जागांसाठी आता ही निवडणूक होत आहे. शेतकरी विकास पॅनल आणि भूमिपुत्र शेतकरी सहकार बँक बचाव पॅनलच्या उमेदवारांत खरी लढत होत आहे.12 जागांसाठी 31 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 1053 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी शंभरवर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक समृतं जाधव हे काम पाहत आहेत.
वैजापूर येथील मतदान केंद्रावर आ.रमेश पाटील बोरणारे व जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत यांनी मतदानाचा हक्क बजावला...
जिल्हा बँक निवडणूकीतील मतदार संख्या ...
मतदान केंद्र वि.का.सोसायटी बिगर शेती पणन प्रक्रिया
छ.संभाजीनगर - 74 158 20
सिल्लोड - 84 15 10
गंगापूर. - 102 29 04
रत्नपूर. - 25. 06 01
फुलंब्री. - 60 05 02
वैजापूर. - 115. 34 03
सोयगाव - 36 10 01
कन्नड. - 98 40 06
पैठण. - 88. 16 01
---------------------------------------------------------------------
एकूण. - 682 323. 48
--------------------------------------------------------------------
0 Comments