news today, अहिल्यानगर - मनमाड मार्गावरील अवजड वाहतूक वळविल्याने वैजापूर शहरात वाहतुकीची कोंडी

वैजापूर, ता.14 - अहिल्यानगर ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर - विळदघाट दरम्यान सुमारे 75 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक गंगापूर -  वैजापूरमार्गे मनमाड अशी वळविल्याने गेल्या दोन महिन्यांपासून वैजापूर शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. 

रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विळदघाट ते सावळीविहीरकडे जाणारी एक लेन अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून ही अवजड वाहनांची वाहतूक गंगापूर - वैजापूरमार्गे मनमाड अशी वळविण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरू असून,यापूर्वी देखील हा महामार्ग अवजड वाहतुकीसाठी वारंवार बंद करण्यात आला होता. मात्र, या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅव्हल्स व कंटेनर या अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पूल धोकादायक स्थितीत असल्याने वाहतुकीची कोंडी व अपघातांची संख्या वाढल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यामुळे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी खबरदारीच्या उपाय म्हणून 11 डिसेंबरपर्यंत या रस्त्यावरील एक लेन अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

वाहतूक वळविण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे गंगापूर - वैजापूर मार्गावर अवजड वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे वैजापूर शहरातील डॉ  बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून अपघात घडण्याची शक्यता आहे.. अहिल्यानगर - मनमाड मार्गावरील रस्त्याच्या कामाला विलंब होत असून आणखी एक महिना लागणार असल्याने वैजापूर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच राहणार आहे. 


Post a Comment

0 Comments