news today, अचानक आलेल्या पावसामुळे वैजापूर मार्केटमध्ये कांदा भिजला


लिलाव न झालेल्या शेतकऱ्यांचे कांद्याचे नुकसान 

वैजापूर, ता.03 / प्रतिनिधी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट वर शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा भिजला.तसेच शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
शनिवारी बाजार समितीच्या आवारात नेहमी प्रमाणे जवळपास ६०० वाहनातून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीस आला होता.लिलावासाठी वाहने आल्यानंतर ही वाहने बाजार समितीच्या आवारात लावली जातात. दोन तीन दिवसांपासून पावसाची उघडीप होती.शनिवारी देखील पाऊसाची उघडीप होती.
कांदा मार्केट वर सकाळच्या सत्रात जवळपास चारशे वाहनांचा लिलाव झाला.त्यानंतर दुपार नंतर दुसऱ्या सत्रात साडे चारला  कांदा लिलाव सुरू झाला.मात्र पांच वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला.त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली.या पावसामुळे काही शेतकऱ्यांचा कांदा भिजला.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

पावसाळा असल्याने वाहन धारकाने कांदा झाकण्यासाठी त्यांनी व्यवस्था करायला हवी.अचानक पाऊस झाल्याने एक दोन शेतकऱ्यांचा कांदा भिजला.
व्यापारी रविराज तांबे

बाजार समितीचे कर्मचारी कांदा मार्केट वर नसल्याने वाहन धारक मनमानी करतात.त्यामुळे नंबर शीर वाहनांचा लिलाव होत नाही.पाऊस आल्याने कांदा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.तसेच पाऊस झाल्यानंतर दूसऱ्या सत्रात कमी भाव मिळाला.
कांदा उत्पादक शेतकरी उत्तम साळुंके 

Post a Comment

0 Comments