news today, लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा सण होणार गोड ; 8 जुलैला बँकेच्या खात्यात पैसे जमा होणार

जुलै महिन्याचे पैसे मिळणार ...


मुंबई, ता 02 / प्रतिनिधी - महायुती सरकारच्या महत्वकांक्षी  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे येत्या 8 ऑगस्टला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाव्दारे जमा करण्यात येईल अशी माहिती  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात.जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता वाटप करण्यासाठी लागणारा निधी वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचे वितरण करण्यासाठी 28 हजार 290 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 2 हजार 984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments