देवगाव रंगारी गावाजवळील घटना...
गारज, ता .17 - छञपती संभाजीनगरहून शिऊर येथील महाविद्यालयात परीक्षेचा पेपर देण्यासाठी येतं असताना देवगाव रंगारी गावाजवळ वेळगंगा पुलाच्या वळणावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ओम कडू तुपे (वय 19 वर्ष रा.बाभुळगाव बुद्रुक) या तरुणाचा मृत्यू झाला.
ओम तुपे हा संभाजीनगरहून शिऊर येथील महाविद्यालयात परीक्षेचा पेपर देण्यासाठी मोटार सायकलवरून येत होता. देवगाव रंगारी जवळ वेळगंगाच्या फुलाजवळील वळणावर अचानक मोटारसायकल स्लिप झाल्याने मोटर सायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हाइडरवर आदळली. यात ओमच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने तो जबर जखमी झाला. उपचारासाठी त्याला पोलिस व ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देवगाव येथे दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यास संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविले. मात्र ओम ची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. ओम याच्या पार्थिवावर सायंकाळी साडेआठ वाजता बाभुळगाव बुद्रुक येथील स्मशानभमीमध्ये शोकाकुल वातावरणामध्येल अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बाभुळगावसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे
0 Comments