news today, शिऊर मका खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची परवड ; वेळेत नोंदणी होत नसल्याने नाराजी

वैजापूर, ता.17 -  शिऊर (तालुका वैजापूर) येथे मका नोंदणी केंद्रात शेतकऱ्यांची परवड होऊन वेळेत नोंदणी न झाल्याने तीव्र नाराजी पसरल्याची घटना सोमवारी घडली. या ठिकाणी असलेल्या कल्पतरू महिला सेवाभावी संस्थेच्या ऑनलाईन मका नोंदणी केंद्रात शेतकऱ्यांनी निषेध केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली 
शिऊर येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठीच्या नोंदणी केंद्रात मोठा गोंधळ, नियोजनाअभावी वेळेत नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मक्यापैकी सुमारे ७० टक्के मका आधीच बाजारात विक्री करण्यात आल्याचे शेतकरी बोलत आहेत.
    
 वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील ऑनलाईन मका नोंदणी केंद्रात सोमवारी गोंधळ उडाला होता.

यावेळी शेतकऱ्यांना १,३०० ते १,७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. शासनाने मका खरेदीसाठी शासकीय हमीभाव जाहीर करून वैजापूर शहरातील खरेदी-विक्री संघाला आणि शिऊर येथे कल्पतरू महिला सेवाभावी या खासगी संस्थेला नोंदणी केंद्राची मान्यता दिली. दरम्यान, शिऊर येथे मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी १२ डिसेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नोंदणीसाठी गर्दी केली. मात्र, कागदपत्रे स्वीकारून शेतकऱ्यांना दोन दिवसांनी बोलवले जात असून नियोजनाअभावी नोंदणी वेळेत पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.
     
सोमवार, १५ डिसेंबरला मुदत संपत असताना अनेक शेतकरी नोंदणीसाठी ताटकळत राहीले. शासकीय हमीभाव केंद्राच्या कल्पतरू महिला सेवाभावी संस्थेला नोंदणी आणि खरेदी केंद्रात  शेतकऱ्यांची कागदपत्रे आगाऊ स्वीकारून ती खुल्या जागेत अस्तव्यस्त टाकून दिल्याने अनेक कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, नोंदणी प्रक्रियेत तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,यासह नोंदणीची मुदत वाढवण्यात यावी अशीही मागणी शेतकरी करत आहेत.



Post a Comment

0 Comments