वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील घटना...
वैजापूर, ता.17- भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्द इसमाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात बुधवारी (ता.17) दुपारी घडली. मनसाराम दशरथ आव्हाळे (वय 63 वर्षे) राहणार आघुर असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आव्हाळे यांच्या दुचाकी (क्रमांक MH 57 A 4752) या दुचाकीला ट्रकने (क्रमांक MH 04 HD 6055) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील सहारा हॉटेल समोर जोरदार
धडक दिली. या अपघातात आव्हाळे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले
असता वैद्यकीय अधिकारी यांनी अव्हाळे यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल भुरे व किरण रावते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. धडक देणारा ट्रक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला असून घटनेची वैजापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सहारा हॉटेल आणि स्मारक परिसरात नेहमीच रहदारी असते, अशा वेळी अवजड वाहनांना शहरातून प्रवेश देताना वेळेचे किंवा वेगाचे बंधन का घातले जात नाही, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या घटनेनंतर आता वैजापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक बसवणे, अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणे आणि वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे या मागण्यांनी जोर धरला आहे. पोलीस चौकी जवळ असतानाही अपघात थांबत नसतील, तर सुरक्षिततेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
0 Comments