news today, ' एमबीए' साठी पात्र न ठरल्याने 21 वर्षीय तरुणीची आत्महत्या

वैजापूर, ता.16 - एमबीए अभ्यासक्रमासाठी पात्र न ठरल्याने  एका 21 वर्षीय तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नगिनापिंपळगाव येथे घडली. समाधान जनार्धन गोरसे असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. 

                             समाधान गोरसे 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान गोरसे हा नगिनापिंपळगाव येथील रहिवासी होता. मागील वर्षी त्याने बीएससी पर्यँतचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढे त्याने एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रयत्न केला परंतु  तो पात्र ठरू शकला नाही. यामुळे मागील काही दिवसापासून तो नैराश्यात होता. दरम्यान 12 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता तो घरात कुणाला काहीही न सांगता  बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आलाच नाही. कुटुंबियांनी त्याचा बसस्थानक, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. अखेर नातलगांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांत समाधान बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. अखेर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह त्याच्या घराशेजारी असलेल्या शेत गट क्रमांक 30 मध्ये असलेल्या एका विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान समाधान याला तीन बहिणी व तो घरातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments