छञपती संभाजीनगर,ता.16 - राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता.15) जाहीर केला असून त्यानुसार 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छञपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने समन्वय समिती जाहीर केली आहे.
या निवडणुकीसाठी मुख्य समन्वय समिती, नियोजन समिती आणि प्रचार. दौरा समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली असून मुख्य समन्वय समितीत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भूमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, व युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक नियोजन समितीत आमदार रमेश पाटील बोरनारे, अब्दुल सत्तार, विलास भुमरे, संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, अण्णासाहेब माने,कैलास पाटील, अशोक पटवर्धन, विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, विश्वनाथ राजपूत, यांची नियुक्ती करण्यात आली आहे
निवडणूक प्रचार दौरा समितीत जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, दिलीप निरफळ, अनिल चव्हाण, अण्णाभाऊ लबडे, नारायण बोडखे, केशवराव तायडे, हनुमंत भोंडवे यांचा समावेश करण्यात आला आहे.
0 Comments