news today, वाघल्यात दोन गटात हाणामारी ; महिलांसह 12 जणांविरुद्ध गुन्हा

वैजापूर, ता.03/ प्रतिनिधी - किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील वाघला येथे ३० जुलै रोजी रात्री घडली. याप्रकारणी परस्परविरोधी तक्रारीवरून महिलांसह बारा जणांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी भिमसिंग चंदलाल चंदवडे व त्याचे अन्य सात साथीदार वाघला येथे देवका संतोष चंदवडे या महिलेच्या घरासमोर आले. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून जुन्या भांडणाच्या कारणावरून देवका व तिचा पती संतोष यांस शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. 
त्यामुळे देवका चंदवडे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून भिमसिंग चंदलाल चंदवडे रा. वाघला, मदन शिवलाल चंदवडे, कृष्णा प्रेमसिग चंदवडे, अमोल रुपचंद चंदवडे (रा.खापरखेडा), सागर रुपचंद चुंगडे, पवन रुपचंद चुंगडे फुलकोरबाई मदन चंदवडे व रेखा भिमसिंग चंदवडे (सर्व रा.वाघला) या आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी भिमसिंग चंदवडे यांनीही संतोष भागचंद चंदवडे, देवका संतोष चंदवडे, भागचंद कचरू चंदवडे व अर्जुन संतोष चंदवडे यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून त्यात आरोपीनी शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केल्याचे म्हंटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक जे. एम. गोरक्ष हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments