वैजापूर, ता.13 - वैजापूर येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी (ता 13) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित 129 व दाखल पुर्व 14 अशी एकूण 143 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व अति सत्र न्यायाधीश श्रीमती एस. के. उपाध्याय यांनी केले होते. या लोक अदालतमध्ये प्रलंबित 1993 व दाखल पूर्व 1861 अशी एकूण 3854 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित 129 व दाखल पूर्व 14 अशी एकूण 143 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
यावेळी मुख्य पॅनल प्रमुख म्हणून न्या. श्रीमती एस. के. उपाध्याय यांनी काम पाहिले. न्यायाधीश डी .एस. पिसाळ न्यायाधीश एन. एस. काळे, न्यायाधीश श्रीमती एस. के. खान, श्रीमती न्यायाधीश एम. ए. बेंद्रे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले तर पंच म्हणून विधिज्ञ सोपान पवार, अशफाक पठाण, एस. आर. थोट, सुशील शिंदे, श्रीमती ज्योती बोराडे यांनी सहाय्य केले.
यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ महेश कदम, सचिव सोहेल पटेल, जिल्हा सरकारी वकील नानासाहेब जगताप, सरकारी वकील मांजा, न्यायालयीन अधिक्षक कामेकर, कर्मचारी अनिल साळवे, प्रशांत भुते, अतुल दिवाकर, पोलिस कॉन्स्टेबल हरेश सोनवणे, मनोज कुळकर्णी यांनी लोक अदालत यशस्वीपणे पार पाडण्या करिता यांनी परिश्रम घेतले
या लोक अदालतीत विज चोरी, धनादेश अनादरण, फौजदारी व दिवाणी विविध राष्ट्रीय बॅक वसुली वाद पुर्व तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली
0 Comments