परसोडा येथे सकाळ अग्रोवन व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मका लागवड व व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉक्टर सूर्यकांत पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक गणेश पवार साहेब, ॲग्रोवनचे मराठवाडा प्रतिनिधी संतोष मुंडे साहेब, अजित वाणी, चेतन सोनवणे, ॲग्रोवनचे वितरण काकासाहेब कवडे, सुदामभाऊ छानवाल, सरपंच बाबा बारसे, राजू छानवाल, कृषी सहाय्यक सुवर्णा मरमट मॅडम, गावकरी बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांनी सूर्यकांत पवार साहेब यांनी माती परीक्षण किती गरजेचे आहे
तसेच बेड पद्धत – पट्टा पद्धत बीज प्रक्रिया, पाण्याचे नियोजन, तन नाशक खत व्यवस्थापन व लष्करी अळीचे वाढते प्रमाण या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले आणि आमच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली मका व कापशी लागवड पद्धत खत व्यवस्थापन लष्करी आळी ला कशा पद्धतीने प्रतिबंधित करायचे फवारणी औषध व खत कसे द्यायचे असे सविस्तर मार्गदर्शन केले.
0 Comments