छञपती संभाजीनगर, ता.05 - अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही राज्यसरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. सरसकट कर्जमाफ करावे, वीजबिलांची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी (ता.04) छञपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
या निदर्शने आंदोलनात खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments