वैजापूर ता.05 - येथील वैराग्यमूर्ती ब्रह्मलिन स्वामी दत्तगिरीजी महाराज यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त वैजापूरात दत्तगिरी आश्रममध्ये विविध जिल्ह्यातील संत, महंत वैजापूरात एकत्र येऊन त्यांनी शनिवारी (ता.04) स्वामी दत्तगिरी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन केले..यानिमित्त आयोजित आठ दिवसीय कार्यक्रमाची सांगताही या संतांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कोपरगाव येथील मठाधिपती स्वामी रमेशगिरी महाराज, स्वामी माधवगिरी महाराज (नाशिक), श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी परमांनदगिरीजी महाराज (भांगशी माता गड, श्री.श्री.1008 महामंडलेश्वर शारदानंदगिरीजी महाराज (पोहेगाव,आश्रम), महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष आखाडा परिषद), स्वामी भोलगिरीजी महाराज (निमगाव), विष्णुगिरीजी महाराज (शिवराई), स्वामी गुलाबगिरीजी महाराज (नांदगाव) याशिवाय राज्यातील ईतर आश्रमातील पन्नास संत याप्रसंगी उपस्थित होते.
या सर्व महंतांचे पूजन आश्रम सेवेकरी महंत ज्ञानानंदगिरी महाराज,रामदास दाणे, रामकृष्ण पुतळे, सुनील मोटे, बंडू वाघ, विजय वाणी, अशोक शेटे, अर्जुन शेळके, हरिभाऊ शिंदे, संतोष साळुंके, संजय महाजन, भास्कर गायकवाड, अविनाश खांबेकर, हर्षद राजपूत, भागीनाथ महाजन, जगदीश ठोंबरे, सुभाष ठोंबरे, अमोल बनकर, विठ्ठल निकम, बापू गावडे यांनी केले. सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले तर रामकृष्ण पुतळे यांनी आभार मानले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, शिल्पाताई परदेशी, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती, माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख, अल्ताफ बाबा, बाबुराव वाणी, रमेश हाडोळे यांचीही उपस्थिती होती.
0 Comments