news today, वैजापूर तालुक्यात आतापर्यंत 733.5 मि.मी.पाऊस ; लोणी मंडळात सर्वाधिक 1022.3 मि.मी.पावसाची नोंद

वैजापूर, ता.05 - तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस झाला.  सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील छोटे मोठे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहे. तालुक्यात सरासरी 549 मि.मी.पाऊस पडतो. यावर्षी मात्र पावसाने सरासरी ओलांडली असून जून ते सप्टेंबर दरम्यान 733.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.



वैजापूर तालुक्यात सर्वाधिक 1022.3 मि.मी.पाऊस लोणी महसूल मंडळात तर सर्वात कमी पाऊस 190.9 मि.मी.पाऊस बाबतरा महसूल मंडळात झाला. जून ते ऑगस्ट दरम्यान  तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 342 मि.मी.पाऊस झाला होता. सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातले. 391 मि.मी.पाऊस शेवटच्या काही दिवसांत झाला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नारंगी धरणासह तालुक्यातील सर्व छोटे मोठे जलसाठे पाण्याने तुडुंब भरले आहेत.अतिवृष्टी व पुरामुळे मात्र शेती पिकांसह घरे व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

वैजापूर तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेला मंडळनिहाय पाऊस पुढीप्रमाणे...

वैजापूर  - 775.3  मि.मी.
खंडाळा - 706.0.  मि.मी.
शिऊर. -   8 35.4. मि.मी.
बोरसर -   642.0   मि.मी.
लोणी. - 1022.3   मि.मी.
गारज -     919.5.  मि.मी.
लासुरगाव - 833.0. मि.मी.
महालगाव  - 665.2 मि.मी.
नागमठाण - 680.3 मि.मी.
घायगाव  -   679.5 मि.मी.
जानेफळ -   770.1 मि.मी.
बाबतरा. -   190.9 मि.मी.
---------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments