वैजापूर, ता.04 - पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प व बोर दहेगाव प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून शनिवारी (ता.04) सायंकाळी नारंगी प्रकल्पाचे 432 क्युसेक तर बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून 324 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नारंगी मध्यम प्रकल्पात 96.18 टक्के पाणीसाठा असून 370 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे गेट क्रमांक 1 व गेट क्रमांक 5 उघडुन त्याद्वारे 432 क्युसेकनेनारंगी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. तर बोरदहेगाव मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले असून या धरणातून 324 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून 1143 क्युसेकने पाणी विसर्ग
शिवना टाकळी मध्यम प्रकल्प 🌊, ता. कन्नड
दि. 04/10/2025 रोजी रात्री 08.30 वाजता शिवना टाकळी धरणाचा पाणीसाठा 98% झालेले असल्यामुळे व पाण्याची आवक धरणात सतत सुरू असल्यामुळे शिवना टाकळी धरणातून *02 गेटद्वारे 747.964 कुसेक्सनी* होत असलेला विसर्ग वाढवून *03 गेटद्वारे एकूण 1143.135 कुसेक्स* विसर्ग शिवना नदीपात्रात करण्यात येत आहे.
धरणात पाण्याची येणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल घाबरण्याचे काही कारण नाही.
🔴 नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे 🔴
कार्यकारी अभियंता
छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग
छत्रपती संभाजीनगर
0 Comments