news today, लोणी खुर्द परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

दिवाळीपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता ?.

लोणी खुर्द, ता.04 - वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील लोणी खुर्द येथे 27 व 28 सप्टेंबर  रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी खुर्द गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग आला आहे.

लोणी खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे करतांना महसूल विभागाचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

शनिवारी (ता.04) लोणी खुर्द येथे ग्राम महसूल अधिकारी अमोल राठोड, कृषी सहाय्यक सुनील मांदळे, ग्रामपंचायत अधिकारी ए.के.शेख ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जगदाळे, आप्पा जाधव, शेतकरी नेते दादाभाऊ तांबे यांच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.परिसरासह सर्व गावातील पंचनामे अतिशय जलद गतीने सुरू असून दिवाळीपर्यंत या लोकांना अनुदान वाटप होण्याची शक्यता ? असल्यामुळे संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेऊन पंचनाम्याला गतिमान  करून पंचनाम्याची कामे अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याकरिता कामाला गती दिली आहे.  

लोणी खुर्द येथील निलेश निकम, संदीप जाधव, भावलाल वाघ, बाळू सोनवणे, नारायण सोनवणे, सुदाम सोनवणे, कचरु जाधव, भगवान जाधव, संतोष सोनवणे, रवी सोनवणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे व कांदा चाळ यांचे पंचनामे करतांना संबंधित विभागातील महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments