news today, तंत्रज्ञानाच्या युगातील अनोखा साखरपुडा — लंडन ते वैजापूर ग्रामीण 1 ‘व्हिडिओ कॉल’वर जुळले दोन जीव !


वैजापूर, ता .28 - आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान माणसांमधील अंतर कमी करत आहे, याचे उत्तम उदाहरण नुकतेच वैजापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाले. वैजापूर ग्रामीण 1 येथील एका तरुणीचा साखरपुडा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला.

मुलगा सध्या लंडनमध्ये प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत असून, वेळ व अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. वैजापूर ग्रामीण 1 येथे मुलीच्या घरी पारंपरिक विधी करण्यात आले, तर लंडनहून तरुणाने थेट ऑनलाइन उपस्थिती लावत "होकार" दिला.

वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी साखरपुड्याला उपस्थिती लावून मुलास व्हिडिओ कॉलद्वारे प्रश्न विचारून प्रथा पार पाडत शुभेच्छा दिल्या.  समारंभात नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम असे या अनोख्या सोहळ्याचे वर्णन सर्वत्र होत आहे.

मुलाचं नाव आशुतोष शिवाजी पुंड ऍमेझॉन कंपनीत लंडन येथे कार्यरत आहे तो मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदगाव शिंगवे येथील असून कुटंब ही हल्ली पुण्यात राहतो. मुलीचं नाव 
प्रगती गणेश गायकवाड राहणार फुलेवाडी वैजापूर ग्रामीण एक 
मुलगी बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. साखरपुडा स्थळ फुलेवाडी वैजापूर ग्रामीण 1 येथे पार पडला.

Post a Comment

0 Comments