news today, एलपीजी वितरकांचे डीलर कमिशन वाढीसंदर्भात जिल्हाधिकारी स्वामी यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर, ता.27  - छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिन्ही ऑइल कंपन्यांचे एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल गॅस वितरकांनी मागील दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या गॅस वितरक कमिशन वाढ संदर्भात सोमवारी (ता.27) काळ्या फिती लावून शांततेत निषेध नोंदवला आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन सादर केले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देताना जिल्हयातील गॅस  वितरक ..

मागील दोन ते तीन वर्षांपासून एलपीजी वितरकांचे कमिशन वाढ प्रलंबित असून, वाढलेले इंधन दर, वाहतूक खर्च, मजुरी दर, प्रशासनिक खर्च आणि देखभाल खर्च लक्षात घेता सध्याचे कमिशन वितरकांना तोट्यात नेणारे ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे डीलर कमिशनमध्ये किमान 75 रुपये प्रती सिलेंडर इतकी वाढ तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सर्व वितरकांच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

शासन व तेल कंपन्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर शांततेत सुरू असलेला निषेध तीव्र आंदोलनात परिवर्तित करण्यात येईल. असा इशाराही गॅस वितरकांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन (आय) चे दीपक सूर्यवंशी, रवींद्र गुरुदत्ता, मनोज कासलीवाल, मनोज सोनवणे, यश खांबेकर, नारायण खडके, सौरव केदारे, शिवदीप काळे, तरुण कक्कर आदींनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. ही मागणी केवळ वितरकांच्या हक्काची नसून संपूर्ण एलपीजी वितरण व्यवस्थेच्या टिकावसाठी आवश्यक असल्याचे 




Post a Comment

0 Comments