मुंबई, ता 04 - मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठवाडाव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 11 ऑक्टोबरला छञपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर 'हंबरडा मोर्चा' काढण्यात येणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करणार आहेत. त्यानुसार ठाकरे गटाच्यावतीने मराठवाड्यात 05 ते 07 ऑक्टोबर दरम्यान गावबैठका घेतल्या जाणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहे. तर 11 ऑक्टोबरला छञपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाची सांगता केली जाणार आहे.
0 Comments