वैजापूर - गंगापूर रस्त्यावरील दुर्दैवी घटना...
वैजापूर, ता. 08-– स्कॉर्पिओ आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात पती पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर - गंगापूर रस्त्यावर वरखेड फाट्याजवळ सोमवारी (ता.08) सकाळी आठच्या सुमारास घडली.
या भीषण अपघातात वाळूज एमआयडीसीतील कर्मचारी सजन राजू राजपूत (वय 28 वर्ष), त्यांची पत्नी शितल (वय 25 वर्ष) आणि मुलगा कृष्णांश वय (01वर्ष) रा.सटाणा ता. वैजापूर (हल्ली मुकाम-कमळापूर रोड, वाळूज एमआयडीसी)
या तिघांचा जागीच मृत्यू झाला. राजपूत दाम्पत्य हे त्यांच्या चिमुकल्यासह मोटासायकलने (एम.एच. 20, सी.क्यू.0766) सटाणा येथून वाळूज एमआयडीसीकडे जात होते. रस्त्यात वरखेड पाटी येथील नांदूर मधमेश्वर मुख्य कालव्याजवळ बारामतीहून वैजापूरकडे येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने (एम.एच. 19,बी.यू.4214) त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला
जखमी अवस्थेत रूग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी जखमींना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर जीप घटनास्थळी सोडून चालक फरारी झाला. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार विनोद बिघोत, हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिसांनी घेतली आहे.
0 Comments