news today, वैजापूर पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक प्रबोधनाचा संदेश

व्यसनमुक्ती व सायबर फ्रॉडविरोधी जनजागृतीचा अनोखा संदेश 
अन् भूमरे व आमदार बोरणारे यांनीही पोलिसांसोबत धरला ठेका ...

पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे मिरवणुकीच्या अग्रभागी हातात पोस्टर घेऊन समाज प्रबोधन करतांना...

वैजापूर, ता.10 -: राज्यात परवा ढोल–ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पार पडल्या. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्याने काल आपल्या गणरायाच्या विसर्जनात वेगळेपणा जपून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वैजापूर पोलिसांनी एक दिवस उशिरा विसर्जन करत, “समाजाला आरसा दाखवणारा संदेश” देण्याचा अनोखा उपक्रम राबवला. मिरवणुकीचा मुख्य गाभा हा फक्त नृत्य–मिरवणुकीपुरता न ठेवता व्यसनमुक्ती, सायबर फ्रॉडपासून बचाव, कायद्याबाबत जनजागृती आणि सामाजिक संदेश यावर केंद्रित करण्यात आला.  “माणूस उभा आहे वर्दीतला' म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला” हा ठळक संदेश या मिरवणुकीतून नागरिकांपर्यंत पोहोचला गेला.

खासदार संदीपान भूमरे व आ.रमेश बोरणारे यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या टीमचे कौतुक केले....

या मिरवणुकीत केवळ पोलीसच नाही तर लोकप्रतिनिधीही सहभागी झाले. खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे  माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ यांनी स्वतः हजेरी लावत पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या टीमच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. एवढंच नव्हे तर त्यांनी पोलिसांसोबत ठेका धरत डान्स केला आणि बाप्पाच्या निरोप सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली.

पारंपरिक गणेश विसर्जनाला सामाजिक जाणिवांची जोड देत पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम वैजापूरपुरता मर्यादित न राहता आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिक सोशल मीडियावरून या अनोख्या मिरवणुकीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments