वैजापूर, ता.11- शेततळ्यामध्ये एक जण बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे घडली. रामू ठकाजी बारहाते असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून पाच तासानंतरही त्यांचा शोध लागला नाही.
या घटेनबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामू बारहाते हे दुपारी तीन वाजेला चिंचडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४८ मध्ये असलेल्या शेत तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे एपीआय शंकर वाघमोडे, विजय बाम्हंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत रामू बारहाते यांचा शोध लागला नव्हता. शेतळ्यातील पाणी काढून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि तळ्यात पाणी जास्त असल्याने शोध लागला नाही. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
0 Comments