news today, श्री संकट मोचन हनुमान मंदिराच्या बांधकामाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते भूमिपूजन

मंदिराच्या बांधकामासाठी आ.बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर 

वैजापूर, ता.07/प्रतिनिधी - शहरातील श्री संकट मोचन हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धार कामासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी नगरविकास विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या निधीतून अयोध्या मंदिराची प्रतिकृती असलेले हनुमान मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीक्षेत्र सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते शनिवारी (ता 06) करण्यात आले.


वैजापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री संकट मोचन हनुमान मंदिराचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले होते.मंदिराच्या विश्वस्तांनी जिर्णोद्धारसाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून 2 कोटींचा निधी मी मंजूर करून आणला असून अयोध्येची प्रतिकृती असलेले हे मंदिर सुंदर व भव्य व्हावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आ.बोरणारे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, ज्येष्ट नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी भाषणे झाली. 

वैजापूर हे प्राचीन शहर असून संत एकनाथ महाराज यांची सासुरवाडी आहे. या शहरातील श्री संकट मोचन हनुमान मंदिर हे पुरातन मंदिर असून हे मंदिर सुंदर व वैभवशाली व्हावे यासाठी आ.बोरणारे यांनी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीनशे वर्षांनंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा योग आला असून या कामासाठी आणखी निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाचा यामध्ये सहयोग असला पाहिजे असे महंत रामगिरी महाराज यावेळी म्हणाले. 

अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती असलेले संकट मोचन हनुमान मंदिर 

शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती जीवनलाल संचेती व बाळासाहेब संचेती यांच्या परिवाराने स्व.बन्सीलालजी संचेती यांच्या स्मरणार्थ 61 लाख रुपये मंदिराच्या बांधकामासाठी दिले तर इंदरचंद बोथरा यांनी 17 तोळ्यांचा सोन्याचा हार मंदिराला अर्पण केला. सचिन उदावंत व ज्ञानेश्वर टेके यांनी प्रत्येकी एक लाख रुपये दिले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी.शिंदे, मेजर सुभाष संचेती, गुलाबराव पाटील साळुंके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, काशिनाथ गायकवाड, शोभाचंद संचेती, विशाल सेठ संचेती, प्रशांत कंगले,  डॉ.एस.एम.जोशी, डॉ.राजीव डोंगरे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, ॲड.मनोहर दिवाकर, पी.जी.पवार, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, रविंद्रआप्पा साखरे, जितेंद्र चापानेरकर यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.






Post a Comment

0 Comments