वैजापूर, ता.07/ प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैजापूर तालुका गटनेतेपदी विशाल पाटील शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पक्षाचे विधानसभा अध्यक्ष तथा माजी सभापती एल.एम.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवारी (ता.07) येथे घेण्यात आली. या बैठकीत पक्षाची ध्येयधोरणे व पक्षवाढी संदर्भात सांगोपांग चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी कोणाची निवड करायची या विषयावर सविस्तर चर्चा होऊन सर्वांच्या संमतीने जिल्हा उपाध्यक्ष विशाल जगन्नाथ शेळके यांचे नांव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले व त्यांच्यावर आजपासून गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. प्रतापराव निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेशअण्णा चोभे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, युवक तालुकाध्यक्ष शिवप्रसाद डमाळे, युवक विधानसभा अध्यक्ष नितीन आबा तांबे, युवक कार्याध्यक्ष शुभम वाघ, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष जावेद शेख,अमजद शेख, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष रमेश शिनगारे ,तालुका उपाध्यक्ष आबासाहेब कळमकर, तालुका उपाध्यक्ष विजय खोमणे तालुका उपाध्यक्ष विजय शिंदे युवक शहर अध्यक्ष साईराज खरे, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष दिनेश त्रिभुवन, अशोक देवकर, विजय शिंदे, शेराबाबा शेखलाल, अशोक करडे आदी उपस्थित होते.
या निवडबद्दल माजी तालुकाध्यक्ष विजय पवार, माजी विधानसभा अध्यक्ष गणेशदादा चव्हाण, शैलेश सुरासे, जगदीश पवार, गणेश पवार, साईनाथ आहेर, ईश्वर सूर्यवंशी, मुकेश आहेर, रुपटेके गुरुजी आदींनी शेळके यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments