वैजापूर ता.08/ प्रतिनिधी - "गणपती बाप्पा मोर या -पुढच्या वर्षी लवकर" असा जयघोष करीत व संगीताच्या तालावर बेधुंद नाचत हजारोच्या संख्येने पुरुष, महिला, तरुणाईने गणपती बाप्पांना शनिवारी (ता.06) भावपुर्ण निरोप दिला .
येथील नारंगी-सारंगी नदीच्या संगमावर असलेल्या शेवडी (विहीर) व नारंगी धरणात "श्री"मूर्तींचे विसर्जन केलें.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके...
मिरवणुकीत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. व्ही.जी.शिंदे, डॉ .राजीव डोंगरे, व्यापारी संघटनेचे काशिनाथ गायकवाड यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्री विसर्जन मिरवणुकीवर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख (ग्रामीण) अन्नपूर्णासिंह, उपजिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले तसेच श्यामसुंदर कोठाळे, संजय घुगे, ज्ञानेश्वर मेटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन होते.
भाजपचे डॉ.दिनेश परदेशी, भाजपचे प्रशांत कंगले, विशाल संचेती, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, नायब तहसीलदार कुमावत, मंडळ अधिकारी जितेंद्र चापानेरकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश बोथरा हे शेवटच्या गणेश मंडळाचा गणपती विसर्जित होईपर्यंत मिरवणुकीत उपस्थित होते. रात्री बाराच्या ठोक्याला सर्व वाद्ये बंद झाली आणि गणेश मंडळांनी आपली गणेश मूर्ती विसर्जनस्थळी विसर्जित केली.
श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले भाजपचे डॉ. दिनेश परदेशी,अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे, तहसीलदार सुनील सावंत, भाजपचे प्रशांत कंगले, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, रामचंद्र पिल्दे आदी...
विशेष म्हणजे नगर पालिका व गुरुदत्त आंबेडकर परिवाराच्यावतीने गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. नगर परिषद मानाचा गणपती व कै.आर.एम.वाणी यांनी स्थापन के लेल्या श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाचे" श्री" मुर्ती विसर्जन दुपारच्या तीन वाजेलाच अत्यंत शिस्तीने मुलींच्या लेझीम पथक व पारंपरिक वाद्य वाजवत विसर्जन झाले.. तालुक्यातही श्री विसर्जन शांततेत पार पडले.
0 Comments