शहरातील खान गल्ली परिसरातील रजा मशिद येथून सकाळी नऊ वाजता मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक टिळक रोड, गांधी रोड, महाराणा प्रताप रोड मार्गे दर्गाबेस येथे पोहचल्यानंतर तेथून नेहमीच्या परंपरा मार्गावरून जामा मशिद मार्गावरून रजा मशिद येथे पोहचेल व तेथे मिरवणुकीचा समारोप होईल. नौगाजीबाबा दर्गा तसेच शहरातील मुस्लिम बहुल भागात अन्नदानाचा कार्यक्रम (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर काझी हाफिजोद्दीन व अहले सुन्नत जमातचे सय्यद जुबेर यांनी केले आहे.
0 Comments