news today, भाव नसल्याने साठवून ठेवलेला कांदा खराब ; शेतकऱ्यांना मोठा फटका

"कांदा सडला, शेतकरी रडला !", कांद्याचे दर घसले...

हसन सय्यद 
----------------------
लोणी खुर्द ता.11- वैजापूर तालूक्यातील डोंगर थडी भागात  "कांदा सडला, शेतकरी रडला !", असे चित्र परिसरात निर्माण झाले. कांद्याचे दर घसरल्याने व साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांपुढे नवीन आव्हान उभे राहीले आहे. 

प्रशासनाच्या नियोजनांचा अभाव जनतेसमोर येत आहे. संध्या शेतकऱ्यांच्या भावनेला कोणी साद घालत नाही .शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मुद्द्यावर कोणी लक्ष घालत नाही. अशा महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित होत नाही. जातिभेदाच्या वनव्याने महाराष्ट्र पोखरतोय, शेतकरी रडतोय. शेतकऱ्यांच्या अश्रु पुसण्यासाठी कोणी उभे राहणार का ? असा प्रश्न निर्माण होतो. 

सद्या कांद्याचे भाव  घसरल्याने शेतकरी म्हणतो आता भाव सुधारतील ! , उद्या भाव सुधारतील ! या आशेवर जगत आहे. परंतु पावसाच्या अवकृपेमुळे आणि अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेला कांदा हा देखील पूर्णपणे नासू लागलेला आहे. शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली  आहे. जास्त भाव मिळेल या आशेमुळे ठेवलेला कांद्याला सद्या  बाराशे तेराशे रुपये भाव मिळत आहे. त्यामध्ये लागवडीचा आणि मशागतीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे हाताश झालेले शेतकऱ्यांच्या मदतीला कोणी धावते का ? यांची अश्रू पुसण्यासाठी कोणी पुढे येतात का ?. हताश झालेला शेतकरी  वाट बघतोय.

चिकटगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील निकम यांच्या चाळीतील खराब झालेला कांदा.( छाया : हसन सैय्यद.)

Post a Comment

0 Comments