वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील घटना...
वैजापूर - नर्सींगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खंडाळा येथे सोमवारी ता.(08) दुपारी घडली.
पायल सुधाकर गोतीस (वय 20 वर्ष) असे मयत तरुणीचे नाव आहे. तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. जगण्याचा कंटाळा आला.अशी सुसाईड नोट तिने लिहून ठेवली होती.
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे हे करीत आहेत.
0 Comments