गावात राबवला अनोखा उपक्रम ; अनेक तरुणांचा पुढाकार..
हसन सय्यद
-----------------------
लोणी खुर्द, ता.09 - वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात लोणी खुर्द येथील तरुण उद्योजक सचिन संजय तांबे या तरुणाने "एक पाऊल स्वच्छतेकडे " म्हणत तरुणांना दिली प्रेरणा "आपला परिसर,आपले घर,अपले अंगण, आपले गाव, स्वच्छ गाव," लोणी खुर्द येथे स्वच्छता मोहीम राबवून दिला निरोगी आयुष्यासाठी स्वच्छतेचा संदेश.
या उपक्रमांतर्गत गावात व इंदीरा नगर ,बाजार पेठ भागात अस्वच्छतेने मोठे साम्राज्य तयार केले होते. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक, वृद्ध, बालक, विद्यार्थी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात आल्याने गावातील लहान मुलांना व जेष्ठ नागरीकांना अस्वच्छतेमुळे रोगराईला सामोरे जावे लागू नये. म्हणून या समस्येला सोडवण्यासाठी सचिन तांबे यांनी वडील स्व.संजय तांबे सर यांच्या सेवाभावी फाऊंडेशनच्या मार्फत गावात कचरा गाडी चालू करण्याचा निर्णय घेतला. कचरा गाडीचे उद्घाटन लोणी खुर्द येथील इंदीरा नगर येथे ज्येष्ट नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले .सर्वांनी "स्वच्छ लोणी, आदर्श लोणीचा "नारा दिला...
यावेळी सचिन तांबे म्हणाले की, वडिलांच्या स्मरणार्थ गावातील नागरिकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा केला असून गावातील केर, कचरा व नागरिकांच्या आरोग्याकडे,गावातील स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी तांबे फाउंडेशन कटिबद्ध राहील. करिता या नव उद्योजक तरुणांने गावातील नागरी वसाहतीतील आरोग्याच्या समस्या कडे लक्ष देऊन "एक पाऊल स्वच्छतेकडे "असा नारा देत गावातील समस्या सोडवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे. यामुळे गावातील विविध पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी तांबे यांचे कौतुक केले.
यावेळी सोमनाथ तांबे, योगेश औटे, भोलेनाथ अवचिते, गोरख महाले, साईनाथ सोनवणे, दादासाहेव तांबे, ज्ञानेश्वर बापू तांबे, विजय गोदावरे, शेषराव सोनवणे, श्याम सोनवणे, विक्रम तांबे, त्रंबक चव्हाण, रवि तांबे आदी गावकरी उपस्थित होते.
0 Comments